पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील व खिलारवाडी (ता. सांगोला )येथील सुपुत्र प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांना मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ पंढरपूर या संस्थेकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार उद्या दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पंढरपूर येथे वितरित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे असणार आहेत.अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेखा भालेराव यांनी दिली.
या अगोदरही डॉ. काळेल यांना आदर्श शिक्षक, आदर्श समाजसेवक, आदर्श प्राध्यापक व जीवनगौरव यासारखे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. व नुकतीच त्यांची "शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग'' व "ग्रामीण भारताचे सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील'' ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

