पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वेळापूर येथील रॉयल इंडस्ट्रीज येथे शैक्षणिक अभ्यास दौरा केला.
या अभ्यास दौ-यात ३९ विद्यार्थी व ३ प्राध्यापक सहभागी झाले होते. रॉयल इंडस्ट्रीज येथे कृषी उपयोगासाठी प्लास्टिक पाइप्स, घरगुती पाण्याच्या टाक्या तसेच विविध औद्योगिक प्लास्टिक उत्पादनांची निर्मिती केली जाते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उत्पादन प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ऑटोमेशन सिस्टीम्स, इलेक्ट्रॉनिक्स-आधारित मशिनरी, सेन्सर्स, कंट्रोल पॅनल्स तसेच पीएलसी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स व संचार तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग समजून घेण्याची संधी मिळाली.
या अभ्यास दौर्याचा उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संचार प्रणाली व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचा प्रत्यक्ष उपयोग समजावून देणे हा होता.
हा अभ्यास दौरा प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. माधव नाईकनवरे व प्रा. महेश झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. तसेच हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जे. करांडे व विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

