कार्याध्यक्षपदी राजरत्न बाबर तर उपाध्यक्षपदी अमर कांबळे व गोपीनाथ देशमुख यांची निवड
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना पंढरपूरच्या तालुकाध्यक्षपदी नामदेव लकडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी अमर कांबळे आणि गोपीनाथ देशमुख यांची निवड करण्यात आली.नामदेव लकडे हे गेल्या दोन वर्षापासून सलग पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदावरती कार्यरत होते त्यांच्या कामावरती पुन्हा विश्वास ठेवून संघटनेचे राज्याचे प्रमुख राजा माने साहेब आणि संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे,नुतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी,नुतन जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांनी पुन्हा त्यांची निवड पंढरपूर तालुकाध्यक्षपदावर करून एक प्रकारे कामाची पोच पावती दिली आहे.
पंढरपूर येथे प्रसिद्धी माध्यमांमध्ये वृत्तपत्र दूरचित्रवाहिनी दैनिक साप्ताहिक स्तंभ लेखन वृत्तलेखन अधिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांची व संपादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये विविध विषयावर सर्वानुमते पत्रकारिता आणि संघटना व संघटने पुढील व पत्रकारिते पुढील विविध आव्हाने याच्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.तसेच डिजिटल मीडिया पत्रकार संघ या संघाच्या पंढरपूर तालुक्याची 2026 ला करिता कार्यकारणी जाहीर करण्यात आली.सर्वच पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी निवडीत सचिव म्हणून अजित देशपांडे,सहसचिव दगडू कांबळे,खजिनदार गणेश चंदनशिवे,प्रसिद्धीप्रमुख नवनाथ खिलारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे पंढरपूर शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

