पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे वैद्यकिय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांच्या अध्यक्षते खाली राष्ट्रीय पोषण माह निमित्त पाककला व निरोगी स्त्री स्पर्धा घेण्यात आल्या.
पाककला स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक श्रीम. वर्षा भागवत कांबळे, द्वितीय क्रमांक श्रीम. शितल रामदास रावळे, तृतीय क्रमांक श्रीम. रेवती विवेक कुलकर्णी, उत्तेजनार्थ श्रीम. वैशाली महेश बिडवे यांनी मिळवला.
सदर स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल ब्रदर गजानन विठ्ठल कपाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच निरोगी स्त्री स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक श्रीम. धनश्री धर्मराज डफळे, द्वितीय क्रमांक श्रीम. सुनिता संतोष देवामारे व तृतीय क्रमांक श्रीम. सोनाली सुहास सावंत यांनी पटकाविला, विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक पुरुषोत्तम कदम यांनी केले.निरोगी स्त्री स्पर्धा पार पाडण्या मागे मोलाचे सहकार्य डॉ. सिमा इंगोले, श्रीम. आरती बनकर व हिंद लॅब यांची मदत महत्त्वपूर्ण होती.
सदर कार्यक्रमात डॉ. रूचा खुपसंगिकर, डॉ. श्रीकांत नवत्रे, आहारतज्ञ अनुराधा वाघमारे, मेट्रन सिंधुताई लवटे, सर्व इन्चार्ज व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

