पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी–पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि. ०२ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत खेडभाळवणी, ता. पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, रासयो समन्वयक प्रा. सुमित इंगोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. गुरुराज इनामदार तसेच खेडभाळवणी गावचे सरपंच डॉ. संतोष साळुंखे, प्रा. सुनील साळुंखे व अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये डोळ्यांचे तपासणी शिबीर, दंतचिकित्सा शिबीर, महिला आरोग्य शिबीर, ग्रामस्वच्छता अभियान तसेच दुपारच्या सत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक विषयांवर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. गुरुराज इनामदार तसेच रासयो अध्यक्ष अविराज साळुंखे, उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, खजिनदार ओंकार पुजारी, सोशल मीडिया ऑपरेटर विजय पवार आणि स्वयंसेवक प्रविण नागटिळक, वैभव व्यवहारे, प्रणव जाधव, स्नेहा कदम, अमृता फुले, वैष्णवी देवकर, सानिया मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले.

