भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त बाल आनंदी मेळावा (बाजार डे) आयोजित करण्यात आला होता.
यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष भाळवणी गावाचे सरपंच रणजित जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले व बाल आनंदी मेळावाचे उदघाटन तेज न्युजचे संपादक प्रशांत माळवदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत केले.
या वेळी संस्थेचे सचिव एच.आर.जमदाडे यांनी या बाल आनंदी मेळाव्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना ‘कमवा व शिका’ याची जाणीव होण्यासह विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी, यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. असे जमदाडे यांनी सांगितले.
या आनंदी मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी, भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन, आप्पे, कचोरी, वडापाव, इडली, मसाला पापड, भजे, पॅटिस आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी भाळवणीचे सरपंच रणजित जाधव, उद्योजक इन्नूस सय्यद,संपादक प्रशांत माळवदे,संस्थेचे सचिव एचआर.जमदाडे,प्रतीक चव्हाण , प्राची माळवदे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रशालेचे पालक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे ,सहशिक्षक,एस.एम.चौगुले ,ए.डी.जाधव ,एस.बी.काळे ,आय.एन.शेख ,एन,एस,जाधव ए.एम.गायकवाड ,सहशिक्षिका पी.पी.काळे ,व्ही.एस.जमदाडे ,पी.व्ही.लिंगे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेतील जेष्ठ सहशिक्षक एस.एम.चौगुले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे यांनी केले.

