मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेमुळे दोन दिवसांपूर्वीचा लांबलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पक्षप्रवेश आज बारामती येथील सहयोग सोसायटी येथे संपन्न झाला. आज ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे व त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या डोंगरे परिवाराच्या या प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ताकद व ऊर्जा मिळाली आहे. या नेतृत्वामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम झाली असून राजन पाटील विरोधी सर्वसामान्य जनता, शेतकरी व तरुण वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
डोंगरे परिवाराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात जनहिताचे कार्य अधिक वेगाने, प्रभावीपणे व लोकाभिमुख पद्धतीने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद निश्चितच वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

