कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे मा.परराष्ट्र सचिव व मेंबर राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व जेष्ठ साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांना विश्वमहा संमेलनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन सादर संमेलनास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली.
त्यावेळी मुळे म्हणाले की,देश विदेशातील सर्व समाज बांधवांना या महासम्मेलन स्थळी उपस्थित राहण्याचं मी आवाहन करणार आहे.तसेच या महासम्मेलनास का हजर राहणे गरजेचे आहे.ते मी सांगून मी स्वतः उपस्थित राहणार आहे.असे हि मुळे म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राजन उरूणकर (दादा), प्रश्विम महाराष्ट्र मुख्य संघटक संतोष मुळे,महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक सुचिता महाडीक, कोल्हापूर समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष भांबुरे,जिल्हा उपाध्यक्ष भारत कोळेकर,जिल्हा उपाध्यक्ष नारायण काकडे, जिल्हा संघटक तुकराम खटावकर, इंचलकरजी शहर अध्यक्ष संजय मुळे, सरोजनी उरुणकर,नामदेव नागरी सह पत संस्थेचे चेअरमन उमाकांत कोळेकर कोल्हापूर जिल्हा सचिव गिरीराज काकडे तसेच सर्व समाज बांधव व माता भगिनी उपस्थित होते.

