इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे
इंदापूर तालुका ग्रामविकास इंदापूर प्रतिनिधी प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत ऊसतोड मजूर कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.निमसाखर परिसरातील बोंद्रे वस्ती तसेच लालपुरी पवारवस्ती येथील ऊसतोड मजूर कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील चार वर्षापासून माजी विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत १५० कुटुंबांना साहित्य वाटप करण्यात आले.यामध्ये अन्नधान्य,उबदार कपडे ,बाथ कीट,शैक्षणिक साहित्य,इत्यादी समावेश आहे.माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी व बुद्धिमत्ता चाचणी स्पर्धा यावेळी घेण्यात आली.यामध्ये ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत समाजातील गरजू,निराधार, अनाथ,बालक,ऊसतोड कुटुंबांना मायेची ऊब देत आपुलकीची साथ देत माणुसकीची भिंत उभारण्यात येत असल्याची माहिती संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.सन १९६२ पासून आजोबा स्वर्गीय कृष्णाजी रणसिंग यांनी सहकार क्षेत्रातून सामाजिक कार्याची सुरुवात केली.वडील स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांनी इंदापूर पंचायत समिती सभापती च्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले. आज तिसरी पिढी समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक, सहकार क्षेत्रात कार्य करीत असल्याचे समाधान व्यक्त करून कोणत्याही व्यक्तीचा इतिहास कर्तुत्वाशिवाय घडत नसल्याचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.
यावेळी विश्वस्त शंकरराव रणसिंग विश्वस्त राही रणसिंग,प्राचार्य डॉ .अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, मुख्याध्यापक प्रमोद भोंग, मुख्याध्यापक महादेव बागल, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ रणसिंग, माजी विद्यार्थी प्रा.डॉ.तेजश्री हुंबे ,प्रा. योगेश खरात,डॉ.बबन साळवे ,प्रा. विद्या गुळीग ,प्रा .सुजाता निंबाळकर ,प्रा.अपेक्षा मेटकरी ,प्रा आकांक्षा मेटकरी इत्यादी मान्यवर व विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब,माध्यमिक विद्यालय तावशी,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


