देवगड प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
फणसगाव पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडलेल्या दिमागदार कार्यक्रमात पंचक्रोशीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते तसेच महाविद्यालयातील व विद्या मंदिरातील शिक्षकांचा, त्यांच्या भरीव कार्याबद्दल जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व्यक्ती तसेच महाविद्यालयाचे मुंबईतील पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
जनजागृती सेवा संस्थेद्वारे , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल प्रोत्साहन देण्याकरिता विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते .
असाच कार्यक्रम शुक्रवार दिनांक 08 जानेवारी रोजी फणसगाव येथील माध्यमिक विद्यामंदिरात संपन्न झाला .याप्रसंगी सौ. अनुश्री नारकर प्रिन्सिपल ,श्री विजय दादासाहेब पाटील मुख्याध्यापक , श्रीमती अरुंधती मुकुंद गोखले - शिक्षिका , प्रोफेसर ज्योत्स्ना कदम ,प्रोफेसर श्री आशिष ढेकणे,प्रोफेसर विनायक जमदाडे , श्री अविनाश सुरेश पाटील- पोलीस पाटील,श्री मिलिंद सोमले- समाजसेवक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या विद्यालयातील शिक्षक वृंदांचा जाहीर सत्कार केल्याने, मनोभावे आपण केलेल्या कार्याला पोचपावती मिळण्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची महाविद्यालयाची ही परंपरा यापुढेही आम्ही अशीच चालू ठेवू अशी भावना याप्रसंगी शिक्षकांनी व्यक्त केली .
या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी उंडील गावच्या सरपंच सौ.प्रियांका सरवनकर , श्री दिलीप नारकर - राष्ट्रपती पुरस्कार विजेते (संस्थेचे जेष्ठ सल्लागार), सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे सचिव आणि उद्योजक राजेंद्र नरसाळे,श्री संदेश नारकर -सचिव , श्री राहुल चव्हाण- सदस्य , प्रोफेसर जानवी नारकर ,माजी विद्यार्थिनी मदभावे , उदय दूधवडकर, अध्यक्ष -तरळे पंचक्रोशी पत्रकार संघ,भाई नारकर , श्री बाळा नर - तंटामुक्ती समिती प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते .


