नाशिक जिल्हा प्रतिनिधी तेज न्यूज
ईगतपुरी एस.टी. महामंडळ आगाराच्या वतीने सध्या सुरक्षितता सप्ताह सुरु आहे. यासाठी कागदावर धडाक्याने तयारी व नुसता दर्शनी देखावा आगाराने उभा केला आहे.
प्रत्यक्षात मात्र बसेस विलंबाने धावणे, अकस्मात बस फेरी रद्द होणे, देखभाल व दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यातच बसेस नादुरुस्त होणे,अपघाताचे संभाव्य धोके आदी गंभीर प्रकार सुरुच असुन यामुळे प्रवाशानां सहज, सोपा, सुलभ व सुरक्षीत प्रवासाऐवजी जीव मुठीत धरुन विलंबाने व मनस्ताप देणारा प्रवास करावा लागतो आहे.
अत्यंत जीर्ण, शीर्ण व थातुर मातुर दुरुस्ती केलेल्या बसेस ईगतपुरी तालुक्यातील आदिवासी वाडे, पाडे व अतिदुर्गम भागात धावत आहे हे वास्तव आहे.
एकीकडे जीर्ण झालेल्या बारा पंधरा वर्ष वयोमनाच्या गाडया वा खाजगी वाहनावर परिवहन विभाग बंदी घालतो.अशा वाहनावर थेट मोडतोडची कठोर कारवाई करते.तिथे या ही पेक्षा जीर्ण बसेस रस्त्यावर धावतातच कशा ? यांना परिवहन विभाग परवानगी देतेच कसे ? सामान्य नागरिकाच्यां जीवाशी एस.टी.आगार व परिवहन विभाग कसा काय जीवघेणा खेळ खेळु शकतात ? असे संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
आगाराचा प्रवाशाच्यां जीवाशी खेळ ?
कालबाह्य ठरलेल्या जीर्ण, शीर्ण व दुरुस्तीच्याही पलिकडे गेलेल्या बसेस ईगतपुरी तालुक्यातील आदिवासी वाडे पाडे व अतिदुर्गम भागात धावत आहे. यांना परिवहन विभाग परवानगी कशी देते ? व प्रवाशाच्यां जीवाशी आगार सर्रासपणे कसा काय खेळु शकतो ?
नवनाथ अर्जुन पा.गायकर
सामाजिक कार्यकर्ते


