पुणे प्रतिनिधी सोमनाथ मेटे तेज न्यूज
"आपल्या समाजातील महिला उद्योजिका डॉ. सुनिता अशोकराव पाटसकर, चेअरमन अँड फाउंडर, स्पार्क इंजिनिअर्स उद्योगसमूह,"भोसरी, पुणे २६ यांना दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक कार्य व राष्ट्र उभारणीच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ठ योगदानाबद्दल दिल्ली येथे वर्ड ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन कमीशन्स (WHRPC) या आंतरराष्ट्रीय संस्थेने" "भारत गौरव रत्न श्री सन्मान पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे हे आपल्या समाजास भुषणावह आहे. याचे औचित्य साधून पुणेकर समस्त नामदेव शिंपी समाज, आळंदी धर्मशाळा आणि नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर यांचे संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी "४.०० वाजता डॉ.पाटसकर यांचा उचित सन्मान त्यांचे कंपनीमध्ये म्हणजे SPARK ENGINEERS J BLOCK - 429, MIDC" "BHOSARI, PUNE - 411026
येथे करण्यात आला. त्यासाठी श्री. " प्रभाकर गनबोटे , श्री.संदीप लचके, श्री. सुभाष मुळे, श्री.विजय कालेकर यांनी नियोजन केले होते."
"यावेळी पुणेकर समस्त नामदेव शिंपी समाज, आळंदी धर्मशाळा अध्यक्ष व मुख्य विश्वस्त श्री.प्रभाकर गणबोटे, सचिव श्री. माधव कफणे, खजिनदार श्री.दिलीप वायचळ, विश्वस्त श्री.अरविंद निरगुडे, श्री.सुभाष मेटे, श्री.विजय कालेकर, श्री. संदीप लचके उपस्थित होते."
"तसेच, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आपल्या समाजाचे उद्योजक श्री.दिलीप वायचळ, श्री. एकनाथ सदावर्ते, श्री. समीर कोपर्डे, श्री. संतोष हाबडे, श्री.राजेश महाडिक, श्री. दीपक नेवासकर श्री.नितीन पेठकर, श्री.राहुल अकोलकर उपस्थित होते."
"त्याचबरोबर नामदेव समाजोन्नती परिषद पुणे अध्यक्ष श्री. विजय कालेकर, विभागीय उपाध्यक्ष श्री.रणजीत माळवदे, श्री. सोमनाथ मेटे, श्री.पुरुषोत्तम खर्डे, श्री.राहुल सुपेकर, श्री.शिवाजी माळवदकर, श्री.माधव रंगदाळ, श्री.रत्नाकर निरगुडे, श्री. नारायण गाडेकर हे समाजबांधवही आवर्जून उपस्थित होते."
"समाज भगिनी सौ.वायचळ, सौ. मंगल सदावर्ते, सौ. गायत्री लचके, सौ. शोभा मुळे, सौ. सुलक्षणा महाडिक, सौ.रुपा माळवदकर, सौ.राधिका सुपेकर, सौ. रेखा गाडेकर या देखील उपस्थित होत्या."
"मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलनाने, आणि श्री.स्वामी समर्थ यांचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डॉ.पाटसकर मॅडम यांचे वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला"
"डॉक्टर सुनिता पाटसकर यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची VDO क्लिप यावेळी मोठ्या स्क्रीनवर दाखवली. त्यामध्ये स्थानिक संस्था, महापालिका, महाराष्ट्र शासन, उद्योजक संस्था, नामवंत महिला संस्था, मंडळे , धार्मिक संस्था यांचेकडून मिळालेले विविध पुरस्कार, सन्मानपत्र, ABP Maza वरील मुलाखत हे सर्व पाहून आपल्या समाजात अशा कर्तृत्ववान भूषणावह महिला उद्योजक आहेत याचा अभिमान वाटला. खूप कौतुक वाटले. पतीचे निधनानंतर एका महिलेने मोठ्या कर्तबगारीने आपली कंपनी फक्त सांभाळली नाही तर त्याचा 4 युनिट मध्ये विस्तार केला. ४५० कामगारांना काम देऊन त्यांच्या कुटुंबियांच्या अन्नदात्याही झाल्या.
"मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करणे, ज्या मुलानी परदेशात गेल्यानंतर आई वडिलांशी संबंध ठेवला नाही अशा 15 ते 20 वृद्ध दाम्पत्यांना दररोज दोन्ही वेळेचा डबा पोहोच करणे, त्यांच्या औषध उपचारांचे पाहणे हे काम देखील त्या पहात आहेत. स्वत: पुढाकार घेऊन हास्य क्लब सुरु केला आहे. याशिवाय कनेरसर येथे एक मंदिर बांधले आहे. त्याठिकाणी नित्य पूजा, भजन, कीर्तन होते. शिवाय तेथे ज्येष्ठांना अन्नदानही करण्यात येते."
"आळंदी येथील नामदेव शिंपी समाज धर्मशाळेचे अध्यक्ष, मुख्य विश्वस्तश्री. प्रभाकर गणबोटे आणि नामदेव समाजोन्नती परिषद जेष्ठ समाज बांधव श्री.अरविंद निरगुडे, श्री.दिलीप वायचळ श्री. संदीप लचके यांचे हस्ते डॉ.सुनिता पाटसकर मॅडम यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ , करवीरनिवासी महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिलेले अतिशय सुंदर मानपत्र ही देण्यात आले. मानपत्राचे वाचन श्री.विजय कालेकर यांनी केले तर त्याचे शब्दांकन श्री. सुभाष मुळे, सचिव नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखा यांनी अत्यंत छान केले आहे."
"यावेळी मान्यवरांचे बरोबरच स्पार्क इंजिनीअर्स मधील दिर्घ काळ सेवा केलेले, नव्याने कंपनीत रुजू झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मॅडम सोबत काम करण्याचे अनुभव सांगताना त्यांच्या वक्तशीरपणा, जिद्दीचा, कष्टाळूपणा, कामाच्या गुणवत्तेपणा साठी, नवीन तंत्रज्ञान माहिती करून घेण्याच्या स्वभावामुळे ही कंपनी नावारूपाला आल्याचे सांगून त्यांच्या सामाजिक, धार्मिक कार्याचेही मनापासून कौतुक केले."
"सत्काराला उत्तर देताना डॉ. पाटसकर यांनी त्यांच्या" "आयुष्याचा जीवनपटच उलगडून दाखवला."
केवळ प्रामाणिकपणा, कामातील सातत्य, अभ्यासूपणे, समजून घेऊन काम करण्याची प्रवृत्ती, स्वामी समर्थांचा आशीर्वाद, त्यांचे नामस्मरण, त्यांच्यावर असलेली अपार श्रद्धा, कामगार, स्टाफ यांच्याबरोबर जपलेले आपलेपणाचे संबंध यामुळे उद्योग व्यवसायात इथपर्यंत आल्याचे सांगून, घरामध्ये शांत वातावरण ठेवावे, थोड्याफार कुरबुरी झाल्या तर नामस्मरण करा, शांत रहा, कुटुंबात आनंदी वातावरण ठेवा, मूळ, सुना, नातवंडे यांचेवर प्रेम करा तरच कुटुंब व्यवस्था राहील हे अत्यंत महत्वाचे , मौलिक मार्गदर्शन केले.
"कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनीमधील कर्मचारीवर्गाने अतिशय उत्कृष्ठपणे केले तर सुभाष मुळे यांनी आभार प्रदर्शन केले."
"शेवटी संत नामदेव महाराज यांचे पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यानंतर अल्पोपहार, भेटवस्तूचीही व्यवस्था डॉ.पाटसकर मॅडम यांचे वतीने करण्यात आली."आपल्या समाजातील एका कर्तृत्ववान महिला उद्योजिका यांचा हा सन्मानसोहळा अनेकाना प्रेरणादायी ठरणार हे नक्की!"-
सौ.रेखा नारायण गाडेकर, आकुर्डी


