बावडा प्रतिनिधी तेज न्यूज
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कार्यरत असणाऱ्या रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज च्या कृषीकन्यांनी रावे कार्यक्रमांतर्गत दि. 15 जाने. 2026 रोजी Rawe कार्यक्रमांतर्गत गावामध्ये पोल्ट्री पक्ष्यांचे लसीकरण यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी गावातील कुक्कुटपालकांना पोल्ट्रीमधील प्रमुख रोग, त्यांची लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. राणीखेत, गंबोरो, फाऊल पॉक्स यांसारख्या रोगांपासून संरक्षणासाठी आवश्यक लसीकरण करण्यात आले.
व्हॅक्सिनेशन दरम्यान स्वच्छता, योग्य डोस व वेळेवर लस देण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. या उपक्रमामुळे कुक्कुटपालकांमध्ये रोगप्रतिबंधाबाबत जनजागृती होऊन पक्ष्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
गावातील कुक्कुटपालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत कृषी महाविद्यालय व RAWE विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी कृषी कन्या सुनैना जाधव, कीर्ती कोळी, प्राची कोंडलकर, साक्षी बोराटे,श्रद्धा जाधव,अनामिका कोळेकर, श्रद्धा इंगोले, प्रतीक्षा जाधव उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे तसेच प्रा. एस. एम. एकतपुरे प्रा.एम.एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही .खराडे तसेच प्रा. डी.एस.मेटकरी (विषय मार्गदर्शक) यांचे मार्गदर्शन लाभले.

