पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
जाणता राजा या गाजलेल्या ऐतिहासिक नाटकातील ज्येष्ठ कलाकार, कडवे हिंदुत्ववादी विचारवंत, रायगडाचे धारकरी, कुशल संघटक, हिंदुमहासभेचे माजी प्रदेशाध्यक्ष, उत्कृष्ट प्रवचनकार, प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज तसेच साप्ताहिक “संतमत”चे संस्थापक संपादक ह.भ.प. अनिल शंकर बडवे यांचे आज (शुक्रवारी) निधन झाले.
त्यांच्या निधनाने सांस्कृतिक, वैचारिक व धार्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाट्य, प्रवचन, संघटन आणि वैचारिक प्रबोधन या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या कार्याची दखल समाजातील विविध स्तरांतून घेण्यात येत होती.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, असंख्य शिष्य, अनुयायी आणि चाहते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

