खेड प्रतिनिधी- गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
इंधन बचत कशी करावी, इंधन बचतीचे महत्त्व काय याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.हा इंधन बचत मासिक कार्यक्रम दि.१६/०१/२०२६ते दि.१५/०२/२०२६या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे.
सदर मोहिमेच्या अनुषंगाने इंधन बचत मासिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्य परिवहन खेड आगारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित राजेशिर्के आगार व्यवस्थापक खेड, तसेच प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून भूगोल विषयाचे तज्ञ राज भिंगारे , ज्ञानदीप शाळा भडगाव, खेड यांनी इंधन बचतीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांची उपस्थिती लाभली.
पर्यावरण संवर्धन, पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा काटकसरीने वापर आगाराचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येतो.इंधन बचतीसंदर्भात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

