मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कल्याणबप्पा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
मा. आ .प्रशांतराव परिचारक व मा.आ. यशवंत (तात्या) माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथील सरपंच नारायण जाधव, बिळणसिद्ध पुजारी, युवा नेते रमाकांत नाना पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपची विचारधारा स्वीकारली आहे.!
यावेळी परिचारक म्हणाले की,या अनुभवी नेतृत्वामुळे पंढरपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची व पांडुरंग परिवाराची ताकद निश्चितच वाढणार आहे. सर्व नूतन सदस्यांचे पक्षात सहर्ष स्वागत करण्यात आले.
यावेळी जेष्ठ दिनकर भाऊ मोरे,दिलीपराव चव्हाण,दाजी पाटील भुसणर,सुभाष म्हस्के ,कैलास खुळे ,राजू बापू गावडे,बाबासाहेब पाटील,बंडू नाना पवार,भास्कर कसगवडे,अतुल पवार सह इतर उपस्थित होते.

