जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
शिवसेनेच्या लोणा रावत यांचा प्रभाग क्रमांक ७३ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विजय झाला आहे.जोगेश्वरी पूर्व भागातील या निवडणुकीत त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर पोतनीस यांचा पराभव केला.
अंधेरी येथील मतमोजणी केंद्र असलेल्या गुंदवली मुंबई पब्लिक स्कूलमध्ये लोना रावत यांचा विजय जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला.
प्रभाग क्रमांक 73 मधील इतर बहुजन समाज पक्षाकडून कोमल कुंदन वाघमारे, वंचित बहुजन आघाडीकडून स्नेहा मनोज जाधव, स्मिता सुरेश गांगण, सुहासिनी बबन मोरे, स्नेहाली सीताराम वाडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

