पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी दि.०५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी तालुक्यातील एक लाख ४८ हजार ९०२ पुरुष मतदार तर एक लाख ३६ हजार ९१९ स्त्री मतदार तसेच इतर ०५ अशा एकूण दोन लाख ८५ हजार ८२७ मतदारांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन लंगुटे यांनी दिली.
जिल्हा परिषदेचा करकंब गटासाठी सर्वसाधारण आरक्षण असून ३६ हजार ७०८ इतके मतदार आहेत. त्यामध्ये उंबरे गण (सर्वसाधारण) १७ हजार २२० , करकंब गण (सर्वसाधारण) १९ हजार ४८८ इतके मतदार आहेत.भोसे गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. या गटात ३२ हजार ५८५ मतदार आहेत. त्यामध्ये भोसे गण(नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) १८ हजार २३५, गुरसाळे गंण (सर्वसाधारण) १४ हजार ३५० असे मतदार आहेत.
रोपळे गट अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या गटात ३८ हजार ६४८ इतके मतदार आहेत. त्यामध्ये रोपळे गण(सर्वसाधारण महिला) १८ हजार ६३५ , सुस्ते गण (अनुसूचित जाती महिला) २० हजार १३ असे मतदार आहेत. गोपाळपूर गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. या गटात ३५ हजार १६४ मतदार आहेत. यामध्ये पुळूज गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) १९ हजार ४३४, गोपाळपूर गणा (सर्वसाधारण महिला) १५ हजार ७३० मतदारांचा समावेश आहे.
वाखरी गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. या गटात ३३ हजार ७४२ इतके मतदार आहेत. यामध्ये वाखरी गण (नागरिकांचा मागास प्रवर्ग) १६ हजार ९६४, पटवर्धन कुरोली गण (सर्वसाधारण महिला) १६ हजार ७७८ इतके मतदार आहेत. भाळवणी गट अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या गटात ३४ हजार ४८ इतके मतदार आहेत. यामध्ये भाळवणी गण(नागरिकांचा मागास प्रवर्ग )१६ हजार ४०८, पळशी गण (अनुसूचित जाती महिला) १७ हजार ६४० इतके मतदार आहेत.
टाकळी गट अनुसूचित जाती आरक्षित आहे. या गटात ४० हजार ८८५ इतके मतदार आहेत. यामध्ये टाकळी गण (सर्वसाधारण) २० हजार २६५ , खर्डी गण(अनुसूचित जाती) २० हजार ६२० इतके मतदार आहेत. कासेगाव गट नागरीकांचा मागासवर्ग आरक्षित असून या गटात ३४ हजार ४७ इतके मतदार आहेत. यामध्ये कासेगाव गण (सर्वसाधारण)१७ हजार १५०, सरकोली(सर्वसाधारण महिला) १६ हजार ८९७ इतके मतदार आहेत.

