पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
'बहुजन समाजाचा बुलंद आवाज' म्हणून ओळखले जाणारे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळावे, यासाठी आटपाडी येथील बहुजन समाज बांधवांनी पंढरपूरच्या विठूरायाला साकडे घातले आहे. आटपाडी ते पंढरपूर हे ६० किलोमीटरचे अंतर अवघ्या २० तासांत पायी पार करून या कार्यकर्त्यांनी पांडुरंगाच्या चरणी आपली भावना व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीसांना साद: बहुजनांचा सन्मान करण्याची विनंती
वंचित, शोषित, पीडित आणि अपमानित बहुजनांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात संधी देऊन बहुजन समाजाचा सन्मान करावा, अशी मागणी या पदयात्रेद्वारे करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रभर पडळकर साहेब बहुजनांचा आधार म्हणून काम करत असून, त्यांना 'नामदार' (मंत्री) करावे, अशी आर्त हाक विठ्ठलाच्या चरणी मारण्यात आली.
पंढरीत जंगी स्वागत
पायी चालत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पंढरपुरात आगमन झाल्यानंतर, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर यांनी पांडुरंगाला प्रिय असणारा तुळशीचा हार घालून सर्व कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले.
या मान्यवरांची लाभली उपस्थिती आटपाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यु. टी. जाधव , नगरसेवक पै. अजित जाधव, यशवंतराव मेटकरी, आनंदराव देशमुख, बाळासाहेब मेटकरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने चंद्रकांत काळे, विक्रांत पुजारी, रोहीत जगताप, डॉ. खरजे, कैलास शेंडगे, अनिल सुर्यवंशी.जीवन पोळ, समाधान पुजारी, शंकर काळेबाग, करण लवटे, बालेखान शेख, विशाल गळवे.चिकू पांढरे, निरंजन ऐवळे, अशोक सरगर, जीवन कासार, अनिकेत औंधकर, विशाल मरगळे.सिताराम मेटकरी, अमोल सरगर, विजय वाघमारे, गणेश पुजारी, विनायक मोटे, भाऊसाहेब रूपटक्के, रविंद्र हाके, आदित्य हाके, प्रकाश हजारे, कुमार अंथरूळकर आदींचा सहभाग होता.
आटपाडीकरांच्या या अनोख्या उपक्रमाची आणि श्रद्धेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


