बदलापूर प्रतिनिधी तेज न्यूज गुरुनाथ तिरपणकर
समाजसेवा आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रामजित(जितू) गुप्ता महाराष्ट्रात सर्वश्रुत आहेत.आणि याच त्यांच्या सामाजिक भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयात तेथील अंध विद्यार्थ्यांसोबत आणि इतर सन्मानिय, आदरणीय, प्रतिभावंत व्यक्तींना सोबत घेऊन साजरा केला.
अंध विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करताना जितू गुप्ता सर यांची भावना वेगळीच होती, आपण सर्व सामान्य लोक अंध आहोत,पण प्रगती अंध विद्यालयातील हे विद्यार्थी डोळसपणे आपली दैनंदिन कामे करतात, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम काम करतात, प्रगती अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायलेली गाणी अप्रतिमच होती,त्यांचा वाद्यवृंद त्याच ताकतीने त्यांना साथ देत होता, त्यांच्या कलागुणांचा जितू आहे गुप्ता सर यांनी आपल्या वक्तव्यातून गौरव केला.
जितू गुप्ता यांच्या वाधदिवसाप्रसंगी इंडियन आर्मी ऑपरेशन कारगीलचे महेंद्र गोवर्धन गवई,कमाडिंग ऑफीसर राष्ट्रपती पदक सन्मानित दिलीप नारकर, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप शिरसाट, क्रीडा शिक्षक माणिक पाटील, पद्मश्री पुरस्कार सन्मानित दिगंबर तायडे, समाजसेविका शैला तुरे,पायरसी सेल मुंबईचे मुख्य तपासी अधिकारी रवी वासवाणी,सहकर्म सामाजिक फाउंडेशन कल्याणच्या अध्यक्षा सौ.शितल पाटील, सहकर्म सामाजिक फाउंडेशन कल्याणच्या सदस्या सौ.राजकुमारी गुप्ता, कल्याण येथील हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा उपाध्याय,माणगाव फाऊंडर स्कूलच्या राॅय मॅडम, सेंच्युरी हेल्थकेअर सेंटर बाईंडर सीईओ बालाजी शिंदे, प्रगती अंध विद्यालयाचे खजिनदार लौकिक मांजरेकर, विद्यालयाच्या सेक्रेटरी स्नेहल मांजरेकर, विद्यालयाच्या अध्यक्षा आस्था मांजरेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक तायडे सर, लवाळी रामदासी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पराग बुवा महाराज इतर प्रतिभावंत मान्यवर उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीत रामजित(जितू) महादेव गुप्ता अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.जितू सर यांच्या व्यक्तीमत्वावर कुमारीका पूजा चौहान हिने स्वलीखीत कविता सादर केली.या कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर केली गेली.जितू सर यांनी आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ शाळेसाठी डंबेल्स लेझीम तसेच शिक्षक वृंद व कर्मचारी यांना व व विविध भेट वस्तू दिल्या.हा वाढदिवस सोहळा अविस्मरणीय व शोभनीय असाच होता.सर्व मान्यवरांनी जितू यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी पाटील यांनी केले.


