सोलापुर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील पुलगम बँक्वेट येथे लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D1 (2025–26) रिजन 1 चे एक दिवसीय श्री समर्पण रिजनल काॅन्फरन्स विभागीय परिषद संपन्न झाले. नाव नोंदणी नंतर सत्र-1 सकाळी १०.०० ते १.३०. घेण्यात आले.
पहिल्या सत्राची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रम गणेश वंदना कु. अनुष्का आरकाल व कु. विष्णुप्रिया बोध्दुल व कु. हरिप्रिया बोध्दुल यांचे भरतनाट्यम गीताने करण्यात आले.
सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमनानंतर सभा सुरू करण्याची घोषणा म्हणजे रिजन चेअरमन लायन ॲड. श्रीनिवास कटकुर यांच्या मीटिंग कॉल टू ऑर्डर नंतर ध्वजवंदन, राष्ट्रगीत घेण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित प्रांतपाल एम.जे.एफ लायन डॉ.वीरेंद्र चिखले, सेवानिवृत्त आएएस अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रथम उपप्रांतपाल एमजेफ लायन राजेंद्र शहा, कॉन्फरन्स चेअरमन एमजेफ ला.अतुल सोनिग्रा, रीजन चेअरमन ला.ॲड श्रीनिवास कटकुर सर्व झोन चेअरमन इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सर्वप्रथम रिजन चेअरमन लायन ॲड. श्रीनिवास कटकुर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात थोडक्यात श्री समर्पण विभागीय परिषदेत 270 लायन सदस्य उपस्थित लोकांविषयी मनःपूर्वक स्वागत कृतज्ञता व्यक्त केले.
मुख्य अतिथी व मान्यवरांचा शाल ,मोतीमाळ,गिफ्ट श्री.सिद्धेश्वराचे छोटे प्रतीकात्मक नंदीध्वज देऊन यथोचित सत्कार करण्यात आले.रिजन एक च्या प्रगती अहवाल रिजन सचिव ला चंद्रकांत यादव यांनी वाचून दाखवले
प्रमुख अतिथी सेवानिवृत्त आएएस अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या परिचयानंतर, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपल्या मनोगतात,पर्यावरणाच संरक्षण, स्वच्छतेचे महत्त्व व पर्यावरण प्रतिज्ञा इत्यादीवर सखोल मार्गदर्शन केले
त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते सेवानिवृत्त आएएस अधिकारी व प्रसिध्द मोटीवेशनल स्पीकर इंद्रजीत देशमुख सातारा यांच्या शुभहस्ते रिजन कॉन्फरन्सचे कॉर्डिनेटर लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी संपादक यांनी तयार केलेले श्री समर्पण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तदनंतर सोलापूर जिल्ह्यातील विधीतज्ञ ॲड.असीम बांगी यांना इंद्रजीत देशमुख यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय लायन्स विधीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवेळी कॉन्फरन्स चेअरमन एमजेफ लायन अतुल सोनीग्रा, एमजेफ लायन राहुल दोशी, एमजेफ लायन मंगेश दोशी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी माणूस म्हणून जगताना या विषयावर खुमासदार शैलित व्याख्यान देऊन सर्वांचीच मने जिंकले. देशमुख म्हणाले की, " सध्याची कुटुंब व्यवस्था,नागरिकीकरण व वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे हळूहळू नामशेष होत चाललेली आहे. आपण सर्वच जणं आजच्या चंगळवादाच्या दुनियेत कुटुंब व्यवस्थेतील संस्कार हळूहळू विसरत चाललेलो आहोत, जेव्हा घराघरात गोकुळासारखं आनंदी वातावरण निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगता येईल. आज प्रत्येक व्यक्ती विविध प्राण्यांच्या प्रवृत्तीचा बनत चाललेला आहे,जेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यातला माणूस जागा होईल तेव्हाच आनंदी वातावरण प्रत्येक कुटुंबात निर्माण होईल असेही म्हणाले. त्यानंतर माजी प्रांतपाल एमजेएफ लायन ॲड. एम के पाटील, द्वितीय उपप्रांतपाल एमजेएफ लायन डॉ. किरण खोराटे,प्रथम उपप्रांतपाल एमजेएफ लायन राजेंद्र शहा, प्रांतपाल एमजेएफ लायन डॉ. वीरेंद्र चिखले, व माजी प्रांतपाल एमजेएफ लायन डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वादिष्ट जेवणानंतर पाहिले सत्र संपले.
नंतर द्वितीय सत्र सुरु झाले.
माजी प्रांतपाल लायन जगदीश पुरोहित, लायन राहुल दोशी, लायन मंगेश दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्विझ कॉन्टेस्ट, बॅनर प्रेझेंटेशन,पिन प्रदर्शन स्पर्धा, फोटो कॉन्टॅस्ट स्पर्धा, क्लब ऑफिसर स्पीच स्पर्धा, घेण्यात आल्या. यातील यशस्वी प्रथम तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर रिजन कोऑर्डिनेटर लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी जीवन सुंदर जगण्यासाठी या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. रिजन चेअरमन लायन ॲड. श्रीनिवास कटकुर, प्रांतपाल उपप्रांतपाल,माजी प्रांतपाल यांच्या उपस्थितीमध्ये विविध क्लबचा जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीतील ऍक्टिव्हिटी व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्ट वरून प्रत्येक क्लबला, पी. एस.टी व विविध क्लबच्या केलेल्या कामाचे कौतुक म्हणून त्यांना प्लॅटिनम, डायमंड, गोल्डन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय विभागीय परिषदेसाठी सहकार्य केलेल्या झोन चेअरमन, माजी झोन चेअरमन, कॅबिनेट ऑफिसर व इतर पदाधिकाऱ्यांचाही अवॉर्ड देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थितांमधून 31 लकी ड्रॉ कूपन काढून रंगीत टीव्हीसह,आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. दिवसभरच्या कार्यक्रमांमध्ये नाष्टा चहाची व जेवणची उत्तम सोय करण्यात आलेले होते. या रिजन काॅन्फरन्सला एकुण 270 लायन सदस्यांनी नोंदणी केलेली होती.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी,बहारदार सूत्रसंचालन रीजन कोऑर्डिनेटर लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार रीजन सचिव ला.चंद्रकांत यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नेटकं नियोजनासाठी रिजन एक मधील विविध क्लबचे माजी प्रांतपाल,डाँ. गुलाबचंद शहा, राजशेखर कापसे व सुनिल सुतार व वासुदेव कलघटगी व डाँ. व्यंकटेश यजुर्वैदी व अरविंद कोणशिरसगी व विजय राठी व जगदीश पुरोसहीत व पी सी झपके व अनेक कॅबिनेट ऑफिसर, झोनचे आजी. माजी चेअरमन, लायन्सचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, पदाधिकारी,संचालक मंडळ, लायनचे सर्व सदस्य गण,इतर मित्र परिवार इत्यादींचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता घंटानादाने करण्यात आली.

