सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून शनिवारी यात्रेतील मानकरी सोमशेखर भोगडे यांच्या घरी धार्मिक व मंगलमय वातावरणात देव्हाऱ्यामध्ये दिवे बसवण्याचा कार्यक्रम पार पडला यात्रेनिमित्त दरवर्षी मानकरी यांच्या घरी दिवे बसवले जातात.
ही परंपरा 900 वर्षापासून चालत आली आहे. मानकरांच्या उपस्थितीत भक्तिभावाने दिवे बसवण्यात आले याप्रसंगी पूजा विधी व नैवेद्य अर्पण करण्यात आले.
यावेळी मानकरी सोमशेखर भोगडे, सौ शिवलीला भोगडे, नेहा भोगडे, नितीन सोमशेखर भोगडे, सिध्दाराम शिंगारे, विजयकुमार भोगडे, विवेकानंद कोगटनूर, विरेश कोगटनूर, आनंद लिगाडे, दिपाली लिगाडे, समर्थ लिगाडे,अवनी लिगाडे, विशाल दुलंगे, हणमंत दुलंगे, सिध्दाराम मेंडके, बसवराज शाबादे, वैशाली शाबादे आदि उपस्थित होते.
यावेळी भोगडे कुटुंबीय श्री च्या पुजेसाठी भाग घेतला. उपस्थिताना महाप्रसाद देण्यात आला. मानकरी यांच्या घरामध्ये दिवे बसविण्याची परंपरा आहे.

