म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे तेज न्यूज
पोरे कुटुंबीयांचं दातृत्व, कर्तुत्व, खूप मोठं आहे पण त्यांचं म्हसवडकरांना नेतृत्व पाहण्याची संधी मिळाली असती तर म्हसवड शहराला सुवर्णयुग आले असते असे मत म्हसवड प्रेस क्लबचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी व्यक्त केले.
6 जानेवारी पत्रकार दिनाचे निमित्त पोरे कुटुंबीयांनी पत्रकारांचा सन्मान करून पत्रकार दिन साजरा केला या वेळी इंजि.सुनिल पोरे, करणभैय्या पोरे, ॲड.शुभम पोरे व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना महेश कांबळे म्हणाले म्हसवड शहरात ज्या ज्या वेळी आपत्ती आली. त्या त्यावेळी पोरे कुटुंबीय म्हसवड शहर यांच्या मदतीला धावून आले कोरोनाच्या काळात इंजिनिअर सुनील पोरे यांनी म्हसवड शहरातील लोकांचे प्राण वाचावेत म्हणून स्वखर्चाने अंबुलन्स खरेदी करून जनसेवा केली. त्याचबरोबर सातारा सोलापूर महामार्ग अनेक वर्ष रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर रस्त्याचे काम ही मार्गी लावण्यात मोलाचा वाटा उचलला तसेच कायम कोरडी ठणठणीत असलेली माणगंगा नदीला पुराचे वाहून जाणारे पाणी सोडण्यात यावी यासाठी अमरण उपोषण करून आपण समाजाचे देणे आहोत. हेच सिद्ध केले इंजि. पोरे यांचे दातृत्व कर्तुत्व खूप मोठी आहे मात्र त्यांचे नेतृत्व पाहण्याची संधी म्हसवड करांना मिळाली नाही अशी खंत कांबळे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना इंजि. सुनील पोरे म्हणाले राजकारणात हळवं होऊन चालत नाही. आमचे नेते आणि या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड नगरपालिका निवडणूकीत जो काही निर्णय घेतला तो योग्यच घेतला असेल आणि माझ्या साठी भविष्यात यापेक्षाही काहीतरी चांगला निर्णय घेऊन मला जनसेवा करण्याची संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमा निमित्त म्हसवड शहर व परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार विजय टाकणे विठ्ठल काटकर सुशील त्रिगुणे लुनेश विरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास एल. के. सरतापे सचिन मंगरुळे नागनाथ डोंबे शंकर पानसांडे सचिन सरतापे दीपक काटकर सचिन मेनकुदळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविक करण भैया पोरे यांनी केले तर आभार ॲड.शुभम पोरे यांनी मानले.

