पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पखालपूर येथे गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडव्यात या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागणीनुसार गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी दिवसभर पखालपूरसाठी बसेस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती पंढरपूर आगार प्रमुख योगेश लिंगायत व जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन,जागृत असे गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे. माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. त्यामुळे त्याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते हे विचारात घेऊन पंढरपूर आगाराने गणेश जयंती दिवशी बसफेऱ्या करण्याचे निश्चित केले आहे.
त्यामुळे गुरुवार दि.२२/१/२०२६ रोजी सकाळी सात पासून रात्रीपर्यंत श्रीक्षेत्र पखालपूर येथे जाण्या-येण्यासाठी जुन्या बस स्थानकापासून बससेवा सुरू करण्यात येत आहे. तरी जाण्या-येण्यासाठी जेष्ठ नागरिक,महिला प्रवाशी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख योगेश लिंगायत,स्थानक प्रमुख अंकुश सरगर,ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा पालक विनोद भरते,सुभाष सरदेशमुख,जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर, तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव महेश भोसले,उपाध्यक्ष प्रशांत माळवदे,सदस्य सागर शिंदे,मंगेश देशपांडे, शशिकांत सुगंधी,सतिश निपाणकर यांनी केले आहे.

