भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी ता. पंढरपूर जि.सोलापूर दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन 2025-2026 मधील "मी कोण होणार ?" या उपक्रमांतर्गत 'रयत करिअर कल चाचणी' घेण्यात आली.
यासाठी विद्यालयाचे प्राचार्य शिंदे के.डी. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील विज्ञान शिक्षक माने एम.एस. भोसले एम.के. जमदाडे जी.डी.उपस्थित होते.सदर कल चाचणीचे नियोजन समुपदेशक विधाते बी.ए.व नागटिळक यू.व्ही.यांनी केले.
एकूण 100 विद्यार्थ्यांनी अतिशय शांततामय वातावरणामध्ये कलचाचणी दिली. कलचाचणी विषयी पूर्ण माहिती, कलचाचणी कशी सोडवावी, उत्तरे नोंदवण्याची पद्धत इत्यादींचे मार्गदर्शन समुपदेशक विधाते बी.ए.यांनी केले.शेवटी समुपदेशक नागटिळक यू.व्ही.यांनी सर्वांचे आभार मानले.

