पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्युत अभियांत्रिकी विभागात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ (सत्र-२) साठी द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचे ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडले.
विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. के. शिवशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक नियोजन, परीक्षा पद्धती, प्रकल्प कार्य, औद्योगिक भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम, IEEE उपक्रम, इंटर्नशिपच्या संधी, संशोधन तसेच नवीन उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करून कौशल्यविकासावर विशेष भर द्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन विभाग समन्वयक प्रा.अंजली ए. चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

