"पत्रकार सन्मान सोहळा"
*सस्नेह निमंत्रण*
समाजमन जागृत ठेवणारे
आणि
समाजाच्या जडणघडणीत
मोलाची भूमिका बनवणारे
केवळ पत्रकारच नव्हे तर
एक किमयागारच..असे आपण
सन्माननीय पत्रकार श्री. माळवदे प्रशांत सो.
समाजमनाचा आरसा प्रतिबिंबित करणारी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या चौथ्या स्तंभाला बळकटी देणारी आपली निर्भीड पत्रकारिता तसेच समाजप्रबोधन व समाज हिताच्या या अमूल्य योगदानाबद्दल आपला सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.
आमचे भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेस 29 ऑगस्ट 2025 रोजी आपणा सर्वांच्या सहकार्याने, सदिच्छेने, प्रेरणेने 30 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या तीन दशकांच्या पूर्ततेनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधत.आपणां पत्रकारांसाठी मी छोटेखानी "सत्कार सोहळा" आयोजित केलेला आहे.
तरी ह्या सत्कार सोहळ्यासाठी मी शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी. दुपारी 4.30 वाजता आपणास आमंत्रित करीत आहे.
तरी या सत्कार सोहळ्यास आपण आवर्जून उपस्थित राहून सत्काराचा स्वीकार करावा अशी अगत्यपूर्वक आग्रहाची विनंती.
आपले लेखन, विचार आणि कार्य समाजाला दिशा देत राहो, ह्या सदिच्छेसह.पत्रकार सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी वेळ दुपारी 4.30 वाजता आयोजित केला आहे.
स्थळ भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज नवीन एसटी स्टँड जवळ, धनश्री कॉम्प्लेक्स फ्रेंड्स इलेक्ट्रिकल्स चे वर पहिला मजला गाळा नं.13 व 14 अकलूज आपला सत्कार ही आमचे संस्थेसाठी केवळ औपचारिकता नसून तीन दशकाच्या वाटचालीतील आपणा प्रतीची एक कृतज्ञता आहे.तरी आपण अगत्याने उपस्थित राहून सन्मानाचा स्वीकार करावा
ही पुनश्च आग्रहाची विनंती.
धन्यवाद
आपला विनीत
गजानन रजनी ज्ञानेश्वर जवंजाळ
प्राचार्य
भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज


