उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पुढाकाराने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना स्नेहभोजन.
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
देशाचे नेते तथा मार्गदर्शक, शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक अत्यंत प्रेरणादायी व समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या पुढाकाराने व आयोजनाखाली, श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धाश्रमातील सर्व जेष्ठ नागरिक, माता-भगिनींसाठी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंदाचा आणि समाधानाचा क्षण मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधून, त्यांना मिष्टान्न भोजन देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी नागेश फाटे यांनी सांगितले की, " पवार साहेब नेहमीच समाजातील वंचित व गरजू घटकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही मोठा उत्सव साजरा न करता, वृद्धाश्रमातील आई-वडिलांना पोटभर आणि प्रेमाचे भोजन देणे, हाच त्यांच्या विचारांना खरा मान आहे.
ह्या वेळी जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण,माजी शहर अध्यक्ष सुधीर आबा भोसले,सहकार शिरोमणी कारखाना संचालक योगेश ताड, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख,अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष आदम बागवान, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष गुलाब मुलांनी, अनिताताई पवार, उद्योजक नवनाथ बचुटे सर, उद्योजक गणेश दुरुगकर,भास्कर गायकवाड,संजय पवार,गोरख नाना बागल,समाधान ताड यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल वृद्धाश्रमातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले व संयोजकांना आशीर्वाद दिले.

