सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
राजकारण आणि पत्रकारिता हे डॉ .रवींद्र चिंचोलकर यांचे पुस्तक राजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्राचे चांगले विश्लेषण करणारे आहे . विद्यार्थी तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांनी आवर्जून वाचावे व विविध विद्यापीठांच्या अभ्यासकमासाठी निवडले जावे असे मत भारत सरकारचे माजी गृहमंत्री सुशीपकुमार शिंदे यांनी व्यक्त केले .
दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सोलापूर येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुशीलकुमार शिंदे बोलत होते .
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा . सुधीर गव्हाणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . श्रीकांत येळेगावकर,पुस्तकाचे लेखक रवींद्र चिंचोलकर,राजकीय विश्लेषक व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे तसेच संभाजीनगर येथील विद्या बुक पब्लिशर्सचे शशिकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होते .
यावेळी पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की डॉ . चिंचोलकर यांच्या पुस्तकात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय पत्रकारितेचा आढावा घेतलेला आहेच . याशिवाय पत्रकारिता कशी असावी, राजकारणात कोणते बदल घडायला हवेत यावरही भाष्य करणारे आहे .
प्रा .सुधीर गव्हाणे म्हणाले की पूर्वीच्या काळात राजकीय क्षेत्रात ‘गुन्हेगारी पाश्वभूमी असलेल लोक कमी होते . आता टे प्रमाण वाढत चालले आहे . राजकीय लोक, धनवान, गुन्हेगार आणि निवृत्त सनदी अधिकारी एकत्र येऊन लोकशाहीची वाट लावत आहेत . अशावेळी सर्वसामान्य माणसाची व पत्रकारांची भूमिका वाढते . निकोप लोकशाही निर्माण होण्यासाठी सामान्य माणसाने राजकारणाकडे सजगपणे पाहिले पाहिजे . डॉ चिंचोलकर यांचे पुस्तक महत्वपूर्ण असून त्याचे हिंदी व इंग्रती भाषेतही भाषांतर होण्याची गरज आहे .
पुस्तकाचे लेखक डॉ . रवींद्र चिंचोलकर म्हणाले की, पत्रकारितेत बदल घडविण्याची शक्ती आहे . सोलापुरातील पत्रकारांनी मिरवणुकातील डॉब्लीचा वापर बंद करण्याबाबत जागरूकता निर्माण केली त्यामुळे त्या कार्यास यश मिळाले . तरुणांनी राजकारणाचा तिटकारा न करता चांगले राजकीय नेते होऊन पुढे यावे . पत्रकारितेने राजकारणावर अंकुश ठेऊन त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले.
या कार्यक्रमास पत्रकार, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


