मंगळवेढा प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवेढा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नागणेवाडी येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महायुतीवरील विश्वास दृढ केला. यावेळी नागरिकांना भाजपा–महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीदरम्यान नागणेवाडीतील झोपडपट्टी धारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. झोपडपट्टी धारकांना जागा आणि हक्काची घरे मिळावीत, या मागणीसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तातडीने न्याय देण्याची विनंती करण्यात आली. त्यांनीही या मागणीची गंभीर दखल घेत येत्या तीन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप तसेच सर्व महायुती उमेदवार सक्षम नेतृत्व देण्यास कटिबद्ध आहेत, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


