भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील यशश्री अकॅडमी मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय नवोदय महासराव परीक्षा रविवारी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी पार पडली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व परीक्षेमध्ये संभाव्य चुका टाळण्यासाठी या महासराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातून 202 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक रचना पवन सातपुते 100 पैकी 100 गुण. द्वितीय क्रमांक रुद्र विक्रम भोसले 100 पैकी 98.75.तृतीय क्रमांक आदित्य मंगेश शिंदे 100 पैकी 97.25. चतुर्थ क्रमांक विभागुन स्वराज्य सागर पिंगळे व कृष्णा सर्जेराव गायकवाड 100 पैकी 96.25 गुण. पाचवा क्रमांक विभागुन विराज अंबादास गुजरे व स्वस्तिक सागर खाणे 100 पैकी 96.25 गुण.
परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेकरिता प्रथम बक्षीस 5501, द्वितीय बक्षीस 3501,तृतीय बक्षीस 2501, चतुर्थ बक्षीस 1501 व पाचवे बक्षीस 1001 होते.
परीक्षा पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी श्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लिंगडे व आभार रणजितसिंह लोखंडे यांनी मानले.


