मनुष्य जीवनाचा शाश्वत आनंद रामनास्मरणात आहे:-अनुष्काताई बर्वे
भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये ख्यातनाम कीर्तनकार अनुष्काताई बर्वे सांगत होत्या.
सुरुवातीला पूर्वरंगा मध्ये संत रामदास स्वामी यांच्या ३६ वा श्लोक सदा सर्वदा देव सानिध्य आहे कृपाळू पणे अल्प धारिष्ट्य आहे यावर निरुपण करताना सांगितले की सदा म्हणजे ने मी देवाचे नामस्मरण करत राहणं अतिशय महत्त्वाचे असून देव सदा सर्वकाळ चराचरात वसलेला आहे.त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जसा श्वास तसे उठता बसता सतत कार्य करीता नामस्मरण केले पाहिजे.सध्याच्या काळात तरुण पिढी देव मानायला तयार नसली तरी तो परमात्मा प्रत्येकाच्या ह्रदयात कायम वसलेला असून त्याला जाणण्यासाठी आपल्या ह्रदयाचे चक्षूने त्या परमेश्वराला पाहता येते.परंतू त्यासाठी निष्ठा आणि भाव महत्वाचा आहे असे सांगून उत्तरंगामध्ये संत रामदास स्वामी यांनी केलेल्या कार्याची महती सांगताना चाफळ येथील राम मंदिराची स्थापना रामदास स्वामी यांनी कशी केली.त्यासाठी चांगले काम करताना किती अडचणींना तोंड द्यावे लागले.तरीही रामनामाच्या जोरावर परमेश्वरी कृपेने त्यात यश आले.
त्यावेळी रामराया च्या मुर्त्या कशा आणि कुठून आणायच्या यावेळी प्रत्यक्षात स्वप्नात दृष्टांत देत अंगापूरच्या डोहात मुर्त्या आहेत त्या आण आणि स्थापित कर अशी आज्ञा रामराया ने करत तेथून त्या मुर्त्या आणून चाफळ येथील तयार केलेल्या मंदिरात रामरायाची स्थापना केली.अशी अनेक ठिकाणी हणुमंत रायाचीही मंदिरे स्थापित करुन शक्तीची उपासना करण्यासाठी तरुणांना प्रेरीत केले.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबलावादक ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वादक वैभव केंगार यांनी करत मंत्रमुग्ध केले.
यावेळी भाळवणी आणि पंचक्रोशीतील नामसाधक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अरुणोदय संस्थेचे अध्यक्ष कल्याणभाऊ कलढोणे, रामचंद्र तारळकर, प्रभाकर शिंदे, शंकरराव कलढोणे,सुदाम कलढोणे, तसेच काशिनाथ महाराज शिष्य परिवार अधिक परिश्रम घेत आहेत.



