पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीची संस्था CADCAMGURU, पुणे यांच्यात "Design Technology Partner" म्हणून करार (MOU) स्वाक्षरीसह करण्यात आली.
या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांना डिझाईन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील अद्ययावत औद्योगिक कौशल्ये व करिअर संधी उपलब्ध करून देणे हा आहे.स्वाक्षरी समारंभात विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रा. अतुल कुलकर्णी यांनी MOU समन्वयक म्हणून मोलाची भूमिका बजावली.
या करारानंतर, CADCAMGURU संस्थेच्या तज्ज्ञांमार्फत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "Mechanical Industry’s Expectations from Freshers & Career Opportunities in the Mechanical Design Sector" या विषयावर विशेष सेमिनार घेण्यात आला.
या सत्रात विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलती मागणी, आधुनिक CAD/CAM/CAE तंत्रज्ञान, तांत्रिक प्रावीण्य, आणि डिझाईन क्षेत्रातील संधी यांची सखोल माहिती मिळाली. तसेच फ्रेशर्सकडून उद्योग काय अपेक्षा ठेवतो, आणि त्या पूर्ण करण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हेही समजून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील वास्तवाचे भान आणि करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या तयारीबाबत स्पष्ट दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. श्याम कुलकर्णी यांनी CADCAMGURU संस्थेचे आभार मानले व या भागीदारीमुळे विभागातील विद्यार्थ्यांना उद्योगाशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.या उपक्रमाद्वारे यांत्रिकी विभागाने विद्यार्थ्यांच्या उद्योगाभिमुख शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

