शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज संभाजी वाघुले
पंढरपूर तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीसुद्धा शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भंडीशेगाव मंडलातील शेतकरी काढणार रुमणे व रास्ता रोको ही करणार .
शेळवे :भंडीशेगाव मंडळातील शेतकरी आता रस्त्यावर उतरणार आहेत.व रस्ता रोको ही करणार असल्याची आर्त हाक दिली आहे. कारण भंडीशेगाव मंडलातील पर्जन्यमापक हे नेहमी चुकीचे पर्जन्यमाप दाखवत असल्याचे सिद्ध झालेले आहे. या अगोदर ही अशीच घटना घडलेली आहे. व आता ही अशीच घडलेली आहे.या भागात पाऊस पडुन झालेले नुकसान होऊन ही या मंडलात पाऊस पडलाच नाही अशी गत झाली आहे.
भंडी शेगाव मंडल वगळण्यात आलेले आहे मागेही एकदा पर्जन्यमापक यंत्र बंद पडले म्हणून पीक विम्याच्या भरपाई पासून आपलं भंडीशेगाव मंडळ,भाळवणी मंडल वंचित ठेवलं गेलं होतं, प्रत्येक वेळेस सरकारकडून भंडी शेगाव आणि भाळवनी मंडलावरती अन्याय होत आहे,
भंडीशेगाव मंडलातील शेळवे, भंडीशेगाव, खेडभाळवणी, या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे डाळिंब, द्राक्ष, केळी, ऊस, मका, यासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतमालाचे नुकसान, चाऱ्याची टंचाई आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत हालाखीची झाली आहे.
शेळवे गावातील शेतकऱ्यांनी सांगितले की, “पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस भंडीशेगाव मंडलात झाला. तरी शासनाने या विभागाला भरपाई योजनेतून वगळले आहे, हे अत्यंत अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन भंडीशेगाव मंडल अतिवृष्टीग्रस्त घोषित करून भरपाई द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भंडीशेगाव मंडलातील शेतकरी आंदोलन छेडण्याच्या भूमिकेत आहेत.
शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या:
1. भंडीशेगाव मंडलाला अतिवृष्टीग्रस्त घोषित करावे
2. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी
3. पंचनामे तातडीने करून नुकसान भरून काढावे
“आमच्या हक्काच्या भरपाईपासून आम्हाला वंचित ठेवले, तर आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

