पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे मदत जाहीर केली ही मदत महाराष्ट्रातील 253 महसूल मंडळामध्ये जाहीर करण्यात आली.
परंतु पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळाला या नुकसानग्रस्त व पूरग्रस्त यादीतून वगळण्यात आलेले आहे वस्तुस्थिती बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळामध्ये ज्या गावांचा समावेश आहे त्यामध्ये शेळवे खेड भाळवणी कौठळी वाखरी गादेगाव बंडीशेगाव वाडीकुरवली व पिराची कुरोली या गावांचा समावेश होतो वस्तुस्थिती या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला होता.
त्यामुळे कासाळगंगा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते या बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केलेले आहेत परंतु काल महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तालुक्यातील बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळाला नुकसानग्रस्त यादीतून वगळण्यात आले.
त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंताग्रस्त दिसून येत असून आम्हालाही नुकसानग्रस्त आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूरचे तहसीलदार यांना बंडीशेगाव महसूल सर्कल मंडळातील शेतकऱ्यांनी निवेदन देत मंडळाला नुकसानग्रस्त यादीत समाविष्ट करून आर्थिक मदत द्यावी अशा पद्धतीचे निवेदन देण्यात आलेले आहे.

