पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
येथील शिंपी समाजातील बबनराव भागवत जवंजाळ (वय 86) यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी निधन झाले.
बबनराव जवंजाळ हे कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील वैकुंठ स्मशानभूमीत कै.बबनराव जवंजाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शिंपी समाज बांधव, नातेवाईक उपस्थित होते. दशक्रिया विधी सोमवार दि. 13 रोजी सहकार चौक, कासार घाट येथे होणार आहे.

