मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षी दिला जाणारा नामदेव शिंपी समाजातील प्रतिष्ठेचा नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र पुरस्कृत "हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार" सन २०२५ हा सुप्रसिद्ध हिंदी सिने अभिनेते व "श्री गोविंदजी नामदेव" यांना जाहीर झाला असून त्यांच्या नावाची निवडीचे पत्र नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेजी हिरवे सामाजिक कार्यकर्ते निलेशजी बोंगाळे, अहिल्यानगर नामदेव शिंपी समाज युवक संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणजी धोंगडे, कृष्णा महाराज धोंगडे, शुभम डोगमाने उपस्थित आदी पदाधिकारी यांनी काल त्यांच्या मुंबई गोरेगाव येथील त्यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून पत्र दिले व त्यांचे अभिनंदन करून सन्मान केला लवकरच नियोजित पुरस्कार समारंभामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी सर्व सदस्यांनी निर्धारित निश्चित वेळेत गोविंद जी नामदेव यांच्या निवासस्थानी भेट दिली सर्वांचे गोविंदजी नामदेव यांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले सर्वांसोबत दिलखुलास मनमोकळ्या गप्पा व स्नेहभोजन झाले हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे क्रांतिकारी कार्य तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघाचे कार्य व पुरस्काराची निर्मिती आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कार्य अशा आधी बाबींवरती संवाद झाला या भेटीमुळे सर्वांना आनंद वाटला.
अतिशय कठीण व कष्टाळू परिस्थितीतून गोविंदाजी नामदेव यांनी आपल्या जीवनात अभिनय क्षेत्रामध्ये यश मिळवले आहे. गोविंदजी नामदेव यांना आपल्या समाजाचा विशेष असा अभिमान आहे त्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावल्या नंतरही गोविंदजी नामदेव हेच आपले नावाची ओळख कायम ठेवले त्यांनी नावात बदल केला नाही याबद्दल माहिती दिली तसेच आपल्या वडिलांनी आपला शिवणकामाचा व्यवसायही कला आपल्याला शिकवली असल्याचे त्यांनी सांगितले.
गोविंद नामदेव हे हिंदी चित्रपटांतील एक ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते आहेत, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी १९९२ मध्ये 'शोला और शबनम' या चित्रपटातून पदार्पण केले आणि 'सत्या' या चित्रपटातील <</ठाकूरदास झवळे या भूमिकेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे माजी विद्यार्थी असलेल्या नामदेव यांनी दोन दशकांहून अधिक काळ ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिक्षण आणि कारकीर्दीची सुरुवात
शिक्षण: गोविंद नामदेव हे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे १९७८ चे माजी विद्यार्थी आहेत.
नाट्यक्षेत्र: NSD मधील शिक्षणानंतर त्यांनी तेथील रिपर्टरी कंपनीत १२-१३ वर्षे काम केले.
चित्रपटातील पदार्पण: त्यांनी १९९२ साली डेव्हिड धवनच्या 'शोला और शबनम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि यातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. अशी माहिती माहिती व प्रसारण विभाग नामदेव शिंपी समाज युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून देण्यात आली आहे.

