सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रा डॉ राम वाघ म्हणाले की ,खासगी कोचिंग क्लास संचालकांचे राज्य अधिवेशन सोलापुरात आयोजित करण्यात आले होते मागील 5 वर्षांपासून CCA च्या संघर्ष या अधिवेशनात मांडण्यात आले.
व्ही व्ही पी कॉलेज सोरेगाव येथे आयोजित 6 व्या राज्यस्तरीय सी,सी ए अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी सकाळी 11 वाजता व्ही व्ही पी कॉलेज संस्थापक डॉ जी के देशमुख ,भाजपा शहराध्यक्ष सौ रोहिणी तडवळकर,पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉ निरणकुमार शहा,श्री गिरीश तिवारी,सी सी ए राज्य अध्यक्ष डॉ पी एम वाघ,राज्य सरचिटणीस प्रा ज्ञानेश्वर ढाकणे संयोजक तथा सी सी ए जिल्हाध्यक्ष काशीनाथ भतागुनकी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,या अधिवेशनात
*CCA ची आतापर्यंतची वाटचाल
*CCA चे भविष्यातील धोरण*
खासगी क्लासेसक्षेत्रातील समस्या आणि उपाय
कोचिंग क्लासेस क्षेत्रावर निर्बंध म्हणुन शासनाची येत असलेली नियमावली यासह विविध विषयावर राज्यभरातील विविध जिल्ह्यातील कोचिंग क्लास संचालक यांचे मार्गदर्शन झाले
यामधे प्रा संदीप मस्के,प्रा पांकजकुमार बांडे,वसीम,प्रा उमेश बोरसे पुणे,प्रा अप्पासाहेब मस्के पाटील,प्रा गोंविंद जाधव बीड,प्रा कारभारी सपाटे जालना,प्रा गिरीश मराठे नंदुरबार,प्रा बाळकृष्ण जाधव हिंगोली,प्रा भागवत तोर जालना,,प्रा,संदीप मस्के छत्रपती संभाजी नगर आदींनी विचार व्यक्त केले स्वागत प्रा अजब्राव मनवर यांनी केले प्रास्ताविक संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी केले सोलापूर मधील सैक्षणीक गुणवंत्ता वाढीसाठी हे अधिवेशन उपयुक्त ठरेल असे सांगितले,
सौ रोहिणीताई तडवलकर म्हणाल्या की खासगी कोचिंग क्लास अडचणी बाबत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या सोबत बैठक लाऊ आणि सर्वांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी खासगी क्लासचे योगदान मोठे असल्याचे म्हणाले उद्घाटक डॉ जी के देशमुख यांनी सोलापुरातील शैक्षणिक संधी यावर विचार व्यक्त केले.राज्य अध्यक्ष डॉ पी एम वाघ यांनी शासनाने खासगी कोचिंग क्लास साठी सहकार्य करावेत व नवीन नियमावली बाबत संवाद करावेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊ असे सांगितले
यावेळी अधिवेशनातील सहभागी सर्व संचालकांचा ड्रीम फोय फाउंडेशन तर्फे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आले. तसेच सी सी ए तर्फे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2025 पुरस्कार देऊन विविध जिल्ह्यातील कोचिंग क्लास संचालक मान्यवरांचा गौरव करण्यात आले
हा कार्यक्रम रविवार दि. 12/10/25 रोजी*V.V.P. कॉलेज सभागृह” , सोरेगाव , विजापुर रोड , सोलापुर येथे आयोजित करण्यात आला होता.
येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनात 350 हून अधिक क्लास संचालक सहभागी झाले होते प्रारंभी अस्सल सोलापुरी पाहुणचार स्टॉल उद्धाटन करण्यात आले यामध्ये चादर,टॉवेल,कडक भाकरी,शेंगा चटणी ग्रंथ दालन ठेवण्यात आले,ड्रीम सोलापूर पर्यटन जागर अंतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळ माहिती फलक लावण्यात आले होते
दुपारी सर्वांना अस्सल सोलापुरी जेवण देण्यात आले हूग्गी,शेंगा पोळी धपाटे दही चटणी कडक भाकरी पिटला या जेवणाचे सर्वांनी कौतुक केले
सुत्रसंचलन प्रा राजेश इपर यांनी केले तर आभार प्रा रामेश्वर जंगले यांनी मानले अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रा शिवाजी वालेकर vvp कॉलेज प्राचार्य कुलकर्णी प्रा. मारुती पवार,सौ संगीता पाटील , रामदास नागटिळक,वैभव घाडगे,मोटे,मतीन शेख,राहुल ताटे,देशमुख, प्रशांत माळवदे आदी परिश्रम घेतले