पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील चालू शैक्षणिक वर्षांमध्ये 22 विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड. सध्या चालू असणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात येत असून या विविध स्पर्धेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून आपले विभागीय स्पर्धेचे स्थान निश्चित केले आहे.
यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या आर्चरी स्पर्धेमध्ये ओमनदिवे जिल्ह्यात दुतीय कृष्णा शिंदे जिल्हास्तरीय आर्चरी प्रथम क्रमांक कार्तिक साळुंखे जिल्हास्तरीय रनिंग प्रथम क्रमांक 17 वर्ष डॉजबॉल मुले प्रताप शेंडगे , 17 वर्षे मुली निकिता बागल तनुजा बागल यांची विभागीय निवड चाचणीसाठी निवड त्याचबरोबर प्रथमेश चव्हाण शुभम जगताप, आकांक्षा आवताडे प्रांजली ढेकळे यांची 19 वर्षे मुली विभागीय निवड चाचणीसाठी निवड या सर्व विद्यार्थ्यांनची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याचबरोबर शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील 19 वर्षे मुली जिल्हास्तरीयडवाल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे सध्या सुरू असलेल्या शालेय स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून जास्त दिसून येते सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या दरवर्षी विविध खेळांमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चमकदार कामगिरी करताना दिसत असतात.
यामध्ये शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रकल्प संचालिका वर्षा मोरे प्राचार्य तनुजा यादव उपप्राचार्य नियाज मुलाणी , सहशिक्षक शितल मस्के, लीना बागल, शीतल बागल, सोमनाथ भूईटे, सोनाली मागाडे, मोनाली गायकवाड, शाहीन शेख, अविता कांबळे, शितल राठोड, सीमा रकटे, अजय मोरे, वैभव माने, नवनाथ शिंदे, नवनाथ खांडेकर, तेजश्री गव्हाणे, सोनाली सुळे फर्जना पटेल, फिरोज पठाण आदी शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करत असतात.