पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वामनराव माने प्रशाला कला शास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भैरवनाथवाडी या प्रशाललेच्या 3 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर 1 क्रमांक येऊन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांचा सन्मान आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष वामनराव माने यांच्या हस्ते पार पडला.
पै.केदारनाथ ढोपे (96 किलो ग्रीको रोमन) पै.सार्थक काळे (76 किलो ग्रीको रोमन) पै. शुभम हाके (96 किलो फ्रीस्टाइल) या मल्लानी जिल्हास्तर स्पर्धा जिंकून पुढे कुच केले आहे.या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना धाडसाने व डाव प्रति डाव करून आपल्या खेळाशी प्रामाणिक राहून राज्यस्तरापर्यंत मजल मारावी अशा शुभेच्छा श्री. वामनराव माने यांनी व्यक्त केल्या.
या मुलांना संस्थेचे सचिव सुभाषराव माने, डॉ.प्रतापसिंह माने,विजयसिंह माने,विक्रमसिंह माने,अजयसिंह माने,प्राचार्य उत्तमराव कोकरे ,पर्यवेक्षक सत्यवान शिवशरण ,पै.आप्पासाहेब खांडेकर,तानाजी हाके क्रीडाशिक्षक नानासाहेब मदने,लक्ष्मण लवटे,प्रताप चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

