पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातर्फे ‘माहिती तंत्रज्ञान उद्योगातील विविध पदांवरील जबाबदा-या व कार्यक्षेत्र’ या विषयावर एक अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस.व्ही. पिंगळे यांनी सांगीतले.
या कार्यक्रमासाठी श्री. रूपेश रनवरे, Knowledge Base Consultant, Rezoomex यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान उद्योगातील विविध भूमिका, त्या भूमिकांसाठी लागणारी तांत्रिक कौशल्ये, प्रोग्रॅमिंग कौशल्य, संवाद कौशल्ये, तसेच करिअरच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे यांची सविस्तर माहिती दिली.
श्री. रनवरे यांनी उद्योगातील सध्याचे ट्रेंड्स, नव्या तंत्रज्ञानांची वाढती गरज, व उद्योगमानकांनुसार विद्यार्थ्यांनी स्वतःची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. हे व्याख्यान अत्यंत संवादात्मक स्वरूपात पार पडले, जिथे विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून थेट माहिती मिळवली.
या कार्यक्रमाचे आयोजन संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रयी जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आर. एस. येवले यांनी केले

