भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामदैवत श्री भवानी देवीची यात्रा सोमवार व मंगळवार 7/10/2025 या दिवशी भरलेली होती या यात्रेत अनेक व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे यात्रा कमिटीच्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या हस्ते तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच रणजीत जाधव, उपसरपंच नितीन शिंदे, देवीचे पुजारी हनुमंत जमदाडे,शिक्षक रामचंद्र सावंत, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब कापसे, प्रमोद माने ,उत्तम लिंगे, धनंजय धोत्रे , ग्रामपंचायत सदस्य, पुजारी, यात्रा कमिटी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

