पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर शहर तीर्थक्षेत्र असल्याने शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैद्यरित्या वापर केल्यास मानवी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेऊन दिनांक 28 /10 /2025 रोजी तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा हॉटेलमध्ये वापर होत असल्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
यावेळी पुरवठा निरीक्षक विजय बादल , पिसाळ पोलीस उपनिरीक्षक तसेच पुरवठा शाखेतील महसूल सहाय्यक उमेश हिंगमिरे , नेताजी ओव्हाळ यांचे संयुक्त पथक पंढरपूर येथील मंदिर परिसर प्रदक्षणा मार्ग उज्वला सेतू लगत गजानन महाराज मठालगत घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेल मधून घरगुती वापरातील एकूण ७ सिलेंडर तसेच व्यावसायिक वापरातील ३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले व सदर परिसरातील हॉटेल विक्रेते यांना घरगुती गॅसचा वापर न करता व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करण्याचे प्रशासनामार्फत आव्हान करण्यात आले.



 
 
 
 
 
 
