सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपाला ॲलर्जी होण्याईतपत प्रचंड समर्थन मिळाले आहे. त्यामुळे सत्तेतील भाजपा आता मस्तावली आहे.
त्यातुनच पक्षफोडीचा लागलेला रोग देखील चांगलाच फोफावला आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यात सुध्दा यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे.
याचाच पार्ट-१ आपण ऐनं दिपावली मध्ये पाहिला आहे. अनेकांचे भाजपा पक्षप्रवेश रोखावेत म्हणून आंदोलन सोलापूर करांनी पाहिले. वास्तविक आंदोलने ही जनहितार्थ होत असतात. परंतु ते सत्ताधारी सोयीस्कर रित्या विसरले आहेत.
नुकतेच अतिवृष्टीमुळे खचलेले शेतकरी, अनुदानासाठीचा शेतकऱ्यांचा आक्रोश, नदीकाठावरील गांवात महापुराचे पानी घुसून झालेले नुकसान, सोलापूर हद्दवाढ भागात पाऊसाचे पानी शिरून बाधीत झालेले मध्यम वर्गीय कुटुंबं, शहरातील रस्ते, लाईट, शहराला ८/१० दिवसांनी मिळणारे अनियमीत अपुरे पिण्याचे पानी , बेरोजगारी,वाढते प्रदुषण, लाडक्या बहीणीचे रोखलेले अनुदान ईत्यादी सगळे प्रश्न संपलेत असं गृहीत धरून जिल्हयातील सत्ताधारी भाजपा त्यांच्याच कार्यालया समोर आक्रोश मोर्चा काढून एकमेकांची कपडे फाडण्यात गुंतली आहे..
जनहिताच्या कसल्याही प्रश्नाचं सोयरसुतक नसणारी ही मंडळी ऐनं दिपावली मध्ये जनता व्हेन्टीलेटर वर असताना राजकीय कुरघोडी करीत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवाची आहे. ज्या भाजपा ला सोलापूर करांनी भरभरून दिलं, जिल्ह्यातील अकरा पैकी तब्बल सहा आमदार सत्तेत पाठवले परंतु ते सगळे आज जनतेला गृहीत धरून अक्षरशः खेळवत आहेत. गाजराची पुंगी वाजवावी तशा विकासाच्या भ्रामक गप्पा मारत जनतेची मस्करी करीत आहेत.
आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.आशा वेळी जनहिताच्या कोणत्याही प्रश्नावर न बोलता ही स्वार्थाने बरबटलेली सत्ताधारी मंडळी समाजकारण व राजकारण यांचा पोत घसरवत त्याचे बाजारीकरण करीत आहेत. याला जनता आता पुर्णपणे कंटाळली आहे.आशा दिशाहीन भाजपा नेत्यांनी वेळीच हा नंगानाच थांबवावा अन्यथा आम्हाला ही झुंडशाही रोखण्यासाठी भाजपा कार्यालयाला टाळे लावा आंदोलन छेडावे लागेल. असा इशारा
अक्कलकोट रोड जनहित समिती, प्रबोधन सेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रं.९ व १२ च्या वतीने देण्यात येत आहे.अशी माहिती ॲड. सुरेश- बापु गायकवाड यांनी तेज न्यूजला दिली आहे.

