सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथील निमिष नवनाथ काळेल यांची सोलापूर जिल्हा 14 वर्षे खालील क्रिकेट संघामध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये निवड झाली आहे.
ग्रामीण भागातून स्व कष्टातून त्याने हे यश मिळवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तो सध्य मॉडेल क्रिकेट अकॅडमी इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर येथे प्रशिक्षक सत्यजित जाधव, रोहित जाधव व प्रवीण देशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

