भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील दया (Dr. Ambedkar Youth Association) मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, भाळवणी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
दया मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या तक्षशिला अभ्यासिकेत सध्या दररोज नियमितपणे गावातील अनेक विद्यार्थी या अभ्यासिकेमध्ये शालेय तसेच विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत स्वतःहून येतात व शहरातील अत्याधुनिक अभ्यासिके प्रमाणे पूर्णपणे शांत वातावरणामध्ये अभ्यास करत बसतात. मुलांना ही सेवा तक्षशीला अभ्यासिकेमार्फत पूर्णपणे मोफत दिली जाते.
यामुळेच गावातील शाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक वर्गातील मुलांमध्ये आज शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती झालेली दिसून येत आहे.याचे फलित म्हणजे तक्षशीला अभ्यासिकेच्या माध्यमातून यावर्षी सन २०२५ मध्ये १७ विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर दैदीप्यामान यश मिळविले आहे.
यामध्ये कु. प्रीती सुखदेव गायकवाड स्विमिंग स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक, कु. पायल दत्तात्रय झोडगे गोळा फेक स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, शिवतेज अंकुश गायकवाड तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुणे विभागात तृतीय क्रमांक, पृथ्वीराज महेंद्र वाघमारे तालुकास्तरावर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक, संदेश समाधान गायकवाड एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीस पात्र, तसेच आपल्या इयत्तेत प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे विवेक आण्णासो गायकवाड, संदेश दीपक मागाडे, कु. अंकिता संभाजी कांबळे, कार्तिक मिलिंद कांबळे, कु. गीतांजली महेंद्र वाघमारे, कु. स्मिता दत्तात्रय मागाडे, कु. योगिनी शंकर काटे, कु. संस्कृती राजकुमार गायकवाड, कु. आदिती अंकुश गायकवाड तायक्वांदो स्पर्धेत रेड बेल्ट विजेती इ. विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला.
वाचनाने माणूस प्रगल्भ होतो या उक्ती प्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राथमिक शिक्षक टाकळी सुनील गाडे यांनी तक्षशिला अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावरील २० हजार रुपये किंमतीची ९८१ पुस्तके तक्षशिला अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी भेट दिली.
या कार्यक्रम प्रसंगी मंचावर दया संस्थेचे मार्गदर्शक राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, जळगाव येथील मुख्य शास्त्रज्ञ अरुण भोसले ,अध्यक्ष प्राध्यापक नंदकुमार उबाळे, उपाध्यक्ष जालिंदर गायकवाड, सचिव मारुती भोसले व सदस्य प्रा. डॉ. शाहीर गायकवाड, डॉ. अमोल उबाळे, समाधान गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार उबाळे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व समाज बांधवांना या शैक्षणिक कार्याची थोडक्यात माहिती दिली.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वतःचे करिअर सांभाळत अभ्यासिकेमध्ये समाजातील विद्यार्थ्यांसाठी वेळ देणारे शिलधन भोसले, राजदीप गायकवाड, अर्जुन माने, कु. कांक्षा भोसले, धीरज गायकवाड, सुमित गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

