भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र मंत्रालय भारत सरकार या केंद्र तर्फे महाराष्ट्र राज्यातून आपल्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावचे कलावंत शाहीर सचिन जाधव केराबाई दिलीप भिसे यांची उदयपूर शिल्प ग्राम या ठिकाणी शिल्पदर्शन या कार्यक्रमामध्ये लावणी, पोवाडा सादरीकरणासाठी निवड करून आमंत्रित करण्यात आले.
शिव मल्हार सांस्कृतिक लोककला मंचचे कलाकार शाहीर सचिन बाळू जाधव, केराबाई दिलीप पिसे सोनाली सचिन जाधव ,खंडू भिसे ,गणपत पवार ,भीमराव वाघे ,दीपक गरंडे ,अजय लोखंडे हे सर्व आपल्याच भागातील कलावंत सोबत घेऊन आपल्या महाराष्ट्राचे नाव आणि आपल्या महाराष्ट्राची लोककला राजस्थानच्या उदयपूर या ठिकाणी झळकवण्यासाठी हे सर्व कलावंत त्याठिकाणी पोहोचले आहेत.
या अगोदर ही या कलाकार मंडळीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या कला व संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.अशी माहिती शाहीर सचिन जाधव यांनी तेज न्यूजला दिली.