पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील सुपली व्यायाम शाळेचा पैलवान प्रणव दत्तात्रय लाडे यांने विभागीयस्तरीय कुस्ती स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे 55 किलो वजन गटात नेतृत्व करून दुसरा क्रमांक पटकावला. या व्यायाम शाळेचे मालक दत्तात्रय गोविंद लाडे तर वस्ताद पै. विनायक (आबा) वाघमारे हे काम पाहत आहेत.
यावेळी प्रणव लाडे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन या कार्यक्रमात डॉ नवनाथ बापू खांडेकर , बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुणवंत पैलवानासह सर्वांचा सत्कार केला होता.
त्यावेळी डॉ नवनाथ बापू खांडेकर म्हणाले की प्रणव हा एवढ्या छोट्या तालमीतून विभागीय स्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करत आहे. लवकरच आपल्याला मोठा पैलवान झालेला दिसेल. तसेच प्रत्येकाने आपल्या मुलांना व्यायामाचे महत्व सांगून व्यायाम करायला लावणे. हे काळाची गरज आहे असे डॉ .खांडेकर म्हणाले.
तसेच सुपली या छोटेसे गावातून चांगले पैलवान तयार आहोत व तालमीत चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वांनी मदत करावे असे आवाहन केले व उपस्थित सर्व पैलवानांना चांगले भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. यावेळी आभार प्रदर्शन तालीम मालक दत्तात्रय लाडे यांनी मानले.
प्रमुख उपस्थिती-डॉ नवनाथ बापू खांडेकर सर, मा. बाळासाहेब पाटील, अनिल शेवतकर सर, मा. सरपंच भारत लाडे, शरद यलमर, चंद्रकांत इंगळे, कृष्ण यलमार,प्रदीप खांडेकर, भारत लाडे, तुषार लाडे, महादेव लाडे, चंद्रकांत बडके, सुनील लाडे, धनंजय लाडे, प्रकाश यलमार, अक्षय लाडे, सुधाकर माळी, शिवाजी लोखंडे, सागर कोके, केशव माळी, विकास विभूते, वसंत विभुते, प्रभाकर माळी, भीमराव लिंगे, समाधान माळी व सर्व लहान मोठे पैलवान आणि त्यांचे नातेवाईक