भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री उत्कर्ष वाचनालयाच्या वतीने देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त यशश्री अकॅडमी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजीत जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नितीन शिंदे,प्रा. शशिकांत देशपांडे, भीमा पाटबंधारे विभागाच्या अभियंता रूपाली कांबळे, माजी मुख्याध्यापक भीमराव जाधव, युवा उद्योजक सीताराम माने,अंकुश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रूपाली कांबळे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. वाचनात सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे,शशिकांत देशपांडे, भिमराव जाधव, प्रवीण लिंगडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच रणजीत जाधव (आदर्श सरपंच) शशिकांत देशपांडे (दानशूर व्यक्ती) रूपाली कांबळे (अभियंता )सिताराम माने ( सचिव बिल्डर्स असोसिएशन)सचिन शिंदे (आदर्श शिक्षक) प्रशांत माळवदे (डॉ.कलाम प्रेरणादायी पुरस्कार)सलीम शेख (एस टी शिवाई चालक निवड) आराध्या गवळी (ज्ञानज्योत टॅलेंट सर्च परीक्षा जिल्ह्यात पहिली,शिवण्या गणेश पिसे,राजकन्या कांबळे जिल्ह्यात चौथी,उपासना सचिन शिंदे राज्यात पहिली)प्रणव लाडे, विजय घाडगे (कुस्ती )गौरी कापसे, अमृता मासाळ (जलतरण )साक्षी सतीश शिंदे (जपान येथील उडी दोर स्पर्धेत यश) आर्या माने ( रयत ओलंपियाड परीक्षा )शिवतेज गायकवाड, उपासना इंगोले,विधी इंगोले,अर्जुन इंगोले (तायक्वांडो कराटे) यांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वाचकांच्याकरिता विविध दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक धन्यकुमार गाजरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत माळवदे यांनी केले.आभार श्रेयस गाजरे यांनी मानले. यावेळी शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.