मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या जागतिक संघटनेची सोलापूर जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा राज्य कार्यकारिणीतही समावेश करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
या बैठकीत राज्य संघटकपदी सुरज सरवदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष (सुप्रीम)पदी बालाजी फुगारे, उपाध्यक्षपदी तौफिक नदाफ, सोलापूर महानगराध्यक्षपदी धनराज बगले, तर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माऊली डांगे यांची निवड करण्यात आली. राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सौरभ वाघमारे, मंदार लोहकरे आणि रवी लव्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावर विविध तालुक्यांमध्येही कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सुरज कौलगे, उपाध्यक्षपदी गणेश गांडुळे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी सचिन राठोड, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी अरिफ नदाफ तर उपाध्यक्षपदी राजदत्त रसाळगेकर यांची निवड झाली. करमाळा तालुकाध्यक्ष शितलकुमार मोठे, उपाध्यक्ष हर्षवर्धन गाडे, सांगोला तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने, उपाध्यक्ष शब्बीर मुलानी, माढा तालुकाध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड, माळशिरस तालुकाध्यक्ष स्वागत खपाले, उपाध्यक्ष अण्णा भोसले, तर मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे व उपाध्यक्ष बापू मासाळ यांची निवड झाली आहे.
पंढरपूर तालुका कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष सुरज कौलगे, उपाध्यक्ष गणेश गांडुळे, शहराध्यक्ष जगदीश डांगे, शहर उपाध्यक्ष नागेश काळे, सचिव गोपाळ माळी, प्रसिद्धीप्रमुख पूजा खपाले, खजिनदार समाधान व्हनसाळे, कार्याध्यक्ष अजित देशपांडे यांच्यासह सदस्य म्हणून श्रीराम थेटे, माऊली लोखंडे, तेजस गांजाळे, संदीप बागल, अमोल माने आणि सूर्यकांत माने यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर महानगर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष धनराज बगले, उपाध्यक्ष विजय पारसेकर असून सदस्य म्हणून रश्मी मोहोळकर, आकाश इंगळे, तेजस मुद्दे, राजेश भोई, कोकणे दत्तात्रय संपकाळ, चेतन लिघादे, भावना मंगलपल्ली, अक्षदा चव्हाण, दत्ता केरे आणि मंजुषा दोरकर यांची निवड झाली आहे.
मंगळवेढा तालुक्याचे अध्यक्ष रोहिदास भोरकडे यांनी आपली अवघी टीम बांधली असून मोहोळ तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष विजय पुजारी, उपाध्यक्ष नानासाहेब ननवरे, खजिनदार वैभव जावळे, सचिव वसीम शेख, सहसचिव भैय्यासाहेब कांबळे, सदस्य पद्माकर सोनटक्के, बाळासाहेब पारवे, दिनेश सातपुते, योगेश शिंदे आणि सोमनाथ मुसंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ११ जणांची कार्यकारिणी स्थापन केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच पत्रकारांच्या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चार मोठे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले. त्यांनी जुने व नवे पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवून संघटनेची धोरणे आणि उद्दिष्टे प्रभावीपणे राबवावीत, असे मार्गदर्शन केले. आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि विस्ताराचे नियोजन जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजून दुसरी टीम लवकर निवडली जाणार आहे.

